मुंबई : Allu Arjun अल्लू अर्जुनची प्रमुख भूमिका असलेला 'पुष्पा'(Pushpa)हा सिनेमा बॉक्स ऑफिस आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर धुमाकूळ घालत आहे. सिनेमातील डायलॉग, गाणी प्रेक्षकांच्या पसंतीला पडत आहे. असं असताना 'पुष्पा' सिनेमावर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे. गृहमंत्र्यांना या संदर्भात पत्र लिहून लेखी मागणी करण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना शिवार फाऊंडेशनचे संस्थापक सुभाष साळवे यांचे लेखी पत्र आले आहे. या पत्राद्वारे त्यांनी पुष्पा सिनेमावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. 


गृहमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात नेमकं काय? 


पोलीस वर्दीचा वापर करून जनतेचा पोलीस प्रशासनवरील विश्वास उठेल असे अनेक दृष्ये  सिनेमात दाखवण्यात आलं आहे. यामुळे सिनेमावर तात्काळ बंदी घालावी अशी लेखी तक्रार या पत्रात केली आहे. 


त्यामुळे पोलीस बांधवांना आणि पोलीस समर्थकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत,' अशी तक्रार त्यांनी पत्राद्वारे केली आहे.


'चित्रपट निर्माता व अभिनेता यांच्यावर कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात यावं आणि चित्रपटावर बंदी घालण्यात यावी. असं चित्रीकरण थांबायला पाहिजे यासाठी महाराष्ट्र गृहमंत्र्यांनी पाऊल उचलावं असं या पत्रात म्हटलंय.


जेणेकरून कुठलाही अभिनेता व निर्माता पोलीस प्रशासन, खाकीचा अवमान करण्याच हिंमत करणार नाही,' अशी मागणी सुभाष साळवे यांनी गृहमंत्र्यांकडे केली आहे. 


अल्लू अर्जूनचा नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला 


अल्लू अर्जुन हा तेलुगु स्टार आहे. त्याचा आला 'वैकुंठपुररामुलू' हा चित्रपट फक्त तेलुगुमध्ये बनवला गेला आहे. पण आता तो मोठ्या प्रमाणावर प्रदर्शित करण्याचा विचार आहे.


हा सिनेमा आता हिंदीमध्ये डब केला जाईल. या महिन्यात २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या शनिवार व रविवार रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित केले जाईल.


२६ जानेवारीला 'काश्मीर फाइल्स'चे वेळापत्रक होते ते पुढे ढकलण्यात आले आहे. रिपब्लिक डे वीकमध्ये अक्षय कुमारचा पृथ्वीराज, त्याआधी प्रभासचा राधे श्याम, ज्युनियर एनटीआर आणि रामचरणचा आरआरआर आणि शाहिद कपूरची जर्सीही पुढे ढकलण्यात आली होती.